Header Ads

Remand Home: बालकांना दत्तक घेऊन त्यांच्या सर्वागिण विकास या कुटूंबाच्या माध्यमातून होईल - भाग्यश्री पाटील

 निरिक्षण गृह व बालगृह संस्थेतील बालक दत्तक विधान सोहळा संपन्न

बालकांना दत्तक घेऊन त्यांच्या सर्वागिण विकास या कुटूंबाच्या माध्यमातून होईल - भाग्यश्री पाटील
     अहमदनगर (प्रतिनिधी) - आज कुटुंबिक व अनाहूत परिस्थितीमुळे बालके अनाथ होत आहेत, अशा बालकांना शासनाच्यावतीने  मुला-मुलींचे निरिक्षण गृह व बालगृहातून त्यांचा विकास साधला जात आहे. अशा अनाथ बालकांच्या मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. या मुलांना आई-वडिलांची उणिव भासू न देण्यासाठी पालकांनी घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद असाचा आहे. या बालकांना दत्तक घेऊन त्यांच्या सर्वागिण विकास या कुटूंबाच्या माध्यमातून होईल, असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केला.     मुला-मुलींचे निरिक्षण गृह व बालगृह संस्थेतील बालक दत्तक विधान सोहळा पार पडला. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव भाग्यश्री पाटील, बाल न्याय मंडळ अध्यक्ष शुभांगी तामगाडे, डब्ल्यूएआयसीचे मॅनेजर संजय शेट्टी, सचिव विनिता गुणे, संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.अच्युत चौधरी, सचिव अ‍ॅड.गोविंद मिरीकर, अ‍ॅड.जयवंत भापकर, शकिल फातिमा शेख, खजिनदार अ‍ॅड.विश्वास आठरे, अधिक्षिका सौ.पौर्णिमा माने आदि उपस्थित होते.     प्रास्तविकात संस्थेच्या अधिक्षिका सौ.पौर्णिमा माने यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या परिस्थितीमुळे या बालकांवर ही परिस्थिती ओढावली आहे, अशा बालकांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करुन, त्यांना शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगिण विकास साधला जात आहे. आज पुढाकार घेऊन पालकांनी संस्थेतील दोन मुले व एक मुलींस दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजानेही अशा बालकांनी दत्तक घ्यावे, असे आवाहन केले.     यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी महेंद्र दराडे व संरक्षण अधिकारी वैभव देशमुख यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सौ.शितल प्रभुणे, सीएसए संस्थेच्या लुसी मॅथ्यू, जुई झावरे, ओंकार सरोदे आदि उपस्थित होते.     यावेळी या दत्तक मुला-मुलींचे मान्यवरांनी औक्षण उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. मनोगत व्यक्त करतांना पालक भावूक झाले होते. सूत्रसंचालन रेखा जाधव यांनी केले. शेवटी रविंद्र कानडे यांनी  आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.